Fri. Sep 30th, 2022

पंतप्रधान मोदींनी वाचवले देशाचे अकराशे कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करणार आहेत. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन १६ जुलै रोजी होणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करणार आहेत. महामार्गाच्या उद्घाटनाच्यानिमित्तानं नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फेब्रवारी २०२० मध्ये बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचं काम सुरु झाले होते. पायाभरणी करण्यात आलेल्या या एक्स्प्रेस वेचे काम कसे पूर्ण झाले याचा तपशील शोधण्यासाठी संशोधन पथकाला सांगितले होते , पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुख्य सचिव, डीजीपी यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस वेची पाहणी केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी रोजी या एक्सप्रेस वे ची पायाभरणी केली. त्यानुसार 16 जुलै 2022 रोजी एक्सप्रेस वे चे उद्घाटन होणार आहे.नियोजित वेळेनुसार हे काम फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणं आवश्यक होते. मात्र , आठ महिने अगोदरच हे काम पूर्ण करण्यात आले आहे. वेळेपूर्वीच काम पूर्ण झाल्याने ११०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.

बांधकामासाठी लागणारा खर्च – ७,७६७ कोटी
जमीन खरेदीसाठी खर्च – जवळपास २,२०० कोटी
एक्सप्रेस वे ची लांबी -२९६ किलोमीटर
कुठून सुरु होणार ? – झाशी-अलाहाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक-३५ मधील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळ
कुठपर्यंत ? – आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ
इतक्या जिल्ह्यांतून जाईल – ७ जिल्हे (चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया, इटावा)

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.