Thu. Jan 20th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

  गेले दीड वर्ष देशभरात कोरोनाने थैमान घातले. मात्र यंदा कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे मागील वर्षीची दिवाळी प्रत्येकाने आपआपल्या घरीच साजरी केली. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदाची दिवाळी नागरिक उत्साहाने साजरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दरवर्षीची परंपरा अबाधित ठेवून जवनांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा अबाधित ठेवून त्यांनी जवानांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली तसेच आपले सैनिक हे भारत देशाचे सुरक्षा कवच असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारत हा देश प्रभु श्रीरामांचा आर्दश पुढे घेऊन जात आहे. तर जवानांच्या पराक्रमांमुळे आज देश सुरक्षित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून २००पेक्षा अधिक उपकरणे भारतात तयार होत आहेत त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद अधिक वाढणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *