Thu. May 19th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन केले. पूर्वांचल द्रुतगती मगामार्ग ३४० किमीच्या द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. पूर्वांचल द्रुतगती महामार्गावर ३.२ किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाच्या वेळी संबोधित करताना म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशमधील जनता पूर्वांचल एक्सप्रेस वेची वाट पाहत होती. आज त्यांना मोठी भेट मिळाली आहे. तसेच हा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशाच्या विकासाचा एक्सप्रेस वे ठरेल.’  असे ते म्हणाले, तसेच यावेळी पंतप्रधानांनी १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामावरही भाष्य केले.

 पूर्वांचल द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी २२ हजार ४९५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच हा महामार्ग राज्यातील लखनऊ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या नऊ जिल्ह्यांना जोडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.