Thu. Jan 20th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आरबीआयच्या दोन नव्या योजनांचा शुभारंभ

  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन नव्या योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या योजनांचा शुभारंभ केला. आरबीआय बँकेच्या या नव्या योजनांमुळे गुतुंवणूक वाढणार असून भारतीयांना थेट रोखे बाजारात पैसे गुंतवण्याची संधी मिळणार आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना काळात रिझर्व्ह बँकेने प्रशंसनीय काम केले आहे. देशाच्या विकासात हा काळ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यामध्ये आरबीआयची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  सामान्य लोकांच्या सुविधा वाढवण्यासाठी, आरबीआयने अनेक पावले उचलली आहेत. या नव्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता पर्यंत मध्यम वर्गीय नागरिकांना, कर्मचाऱ्यांना, लहान व्यापारांना तसेच वरिष्ठ नागरिकांना सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूकीसाठी बँक इन्श्युरन्स अथवा म्युचअल फंडसारख्या गोष्टींचा वापर करावा लागत होता. मात्र आता ग्राहकांना आरबीआयच्या दोन योजनांमुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *