पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुणे दौऱ्यावर

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बहूप्रतिक्षीत वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो, नदी काठ सुधार प्रकल्प, एक हजार घरांची लॉटरी, ई-बसचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यासाठी तयारी सुरू केली आहे’, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. तसेच निवडणूकांपूर्वी नागरिकांचे मेट्रोतून धावण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मागील महिन्यात फुगेवाडी ते पिंपरी हा मार्ग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच महापालिकेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा नियोजित होता, मात्र काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.
It was a very nice idea! Just want say thank you for the data you have distributed. Just continue posting this kind of post. I will be your loyal reader. Gives Thank you again.