पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशात पुन्हा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. देशातील दिल्ली, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. २७ एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिल रोजी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशात कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मास्क वापरण्याचा निर्णय ऐच्छिक करण्यात आला आहे. मात्र, अशातच देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहेत. राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ
देशात गेल्या २४ तासांत २ हजार ४८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३९९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात १ हजार ९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ झाली आहे.