Tue. May 17th, 2022

पंतप्रधान मोदी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१’ विजेत्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारी २०२२रोजी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्र भाई हेदेखील उपस्थित राहणार आहेत. २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजाताच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

भारत सरकार नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाज सेवा आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा ३१ बालकांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आले आहेत.

या पुरस्कार्थी बालकांत २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ३२ जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. ७ पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, ९ पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, ५ बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. ७ बालकांना क्रीडा क्षेत्रात, ३ बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाज सेवेच्या क्षेत्रातली प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारीला सर्व पुरस्कारार्थी बालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

1 thought on “पंतप्रधान मोदी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१’ विजेत्यांशी संवाद साधणार

  1. Im wondering if you have noticed how the media has changed? Now it seems that it is discussed thoroughly and more in depth. Frankly it is about time we see a change.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.