पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया सोडण्याबद्दलचं ट्विट केलं होतं. यानंतर त्यांनी महिला दिनापासून माझं सोशल मीडिया अकाउंट महिला सांभाळणार असल्यांच म्हंटलं.
दरम्यान यानंतर आज बुधवारी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींना हा निर्णय घेतला आहे.
या वर्षी होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती स्वत: मोदी यांनी ट्विट द्वारे दिली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव न होण्यासाठी गर्दी न करण्याचा सल्ला दिलाय. यामुळे मोदी होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
तसेच मोदींनी आरोग्य विभागाचं एट ट्विट केलं आहे. यामध्ये कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, याची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान काही तांसापूर्वी मनसेचे माजी आमदार आणि नेते बाळा नांदगावकर यांनीही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवाहन केलं आहे.
ज्या रंगाने आपण रंगपंचमीचा आनंद लुटतो, ते रंग चीन वरुन येतात.
मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी जनतेला ‘या’बाबतीत केलं आवाहन
त्यामुळे शंकेला वाव नको म्हणून, रंगाचा सण रंगाऐवजी गुलालाची उधळण करत खेळू या, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.