Wed. Jun 29th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ख्रिस्ती धर्मगुरूंना भारतभेटीचे आमंत्रण

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचा पाच दिवसांचा दौरा इटलीपासून सुरु झाला. त्यानंतर पंतप्रधान ख्रिस्ती समाजाची धार्मिक राजधानी व्हॅटिकन येथे गेले. व्हॅटिकन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिस्ती समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधानांनी ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे आंमत्रणही केले आहे.

 व्हॅटिकन येथे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वास्तव्य असते. पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भव्य प्रसादात जाऊन त्यांची भेट घेतली. फ्रान्सिस यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची गळा भेट घेतली, तसेच त्यांना कलात्मक भेटवस्तूही दिली आहे. पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना चांदीचा कॅंडलब्रा अर्थात मेणबत्या लावायचा स्टॅंड भेटवस्तू म्हणून दिला आहे. तसेच त्यांना भारत दौऱ्याचे आमंत्रणही पंतप्रधानांनी दिले आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचा पाच दिवसांचा दौरा इटली देशापासून सुरू झाला. इटलीतील दौरा झाल्यानंतर पंतप्रधान व्हॅटिकन येथे पोहचले. व्हॅटिकन ही ख्रिस्ती समाजाची धार्मिक राजधानी आहे. तसेच येथे ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वास्तव्य असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.