Wed. Jun 29th, 2022

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निवडक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पालकांसोबत पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी, यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जाण्याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. कोरोना काळात बहुतेकांना भेटता आले नाही. मात्र, आता इतक्या दिवसांनी तुम्हाला भेटता आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘युग बदलते तसे माध्यमही बदलते. मात्र, तुम्ही तुमच्या परीक्षेच्या तयारीवर विश्वास ठेवा. परीक्षा जीवनातील साधी गोष्ट आहे. परीक्षेकडे तुम्ही सण-उत्सवाप्रमाणे बघा.’

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला. मनात यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जा, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमावरही भाष्य केले आहे. ज्ञान ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, त्यात ज्ञान मिळवायला शिका. ते म्हणाले, दिवसभरात स्वत:साठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइनऐवजी इनरलाइन असाल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.