Jaimaharashtra news

जेलमधील कैद्यांकडून अंबाबाईची ‘अशी’ सेवा!

कळंबा जेलमधील शेकडो बंदीजनांचे हात अंबाबाईच्या सेवेसाठी राबत आहेत. त्याचं कारणही खासच आहे. याच बंदीजनांच्या हातांनी तयार झालेले लाडू नवरात्र काळात भाविकांना देवस्थान समितीच्या वतीने प्रसाद म्हणून देण्यात येतात. यावर्षी 2 लाख लाडवांची ऑर्डर कळंबा जेलला मिळाली आहे. महाप्रसादाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नकळत घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे अनेकजण असतात. मात्र त्यांना माणूस बनून जगण्याचा अधिकार शिक्षा भोगत असताना कळंबा जेल प्रशासनाने दिलाय. त्याचाच भाग म्हणून बंदीजनांच्या हातांना वेगवेगळं काम या कारागृहात दिलं जातं. अशाच एका कामाची सध्या लगबग कारागृहात सुरू आहे.

कारागृहातून मंदिराच्या सेवेत

अंबाबाई मंदिरातील लाखो लाडवांची ऑर्डर यावेळी कारागृहाला मिळाली असून शेकडो बंदीजन यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

सुमारे 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत 31 लाख लाडू कारागृहाने अंबाबाई मंदिरात पुरवले आहेत.

आत्तापर्यंत यातून 2 कोटी 90 लाखांचं उत्पन्न कारगृहाला मिळालंय.

हे लाडू तयार करत असताना त्यांच्या क्वालिटी बाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.

स्वच्छ वातावरणात आणि बंदीजनाकडून स्वच्छतेची काळजी घेऊन ते करून घेतले जातात.

त्यामुळे चविष्ट झालेले हे लाडू भाविकांना समाधानही देतात.

Exit mobile version