Thu. Jul 18th, 2019

5 वर्षांत महाराष्ट्रात कैद्यांची संख्या वाढली 10,000 हून जास्त; कारागृहं Overflow!

0Shares

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळं राज्यातील कारागृहं ओव्हरफ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत.

राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर अशा शहरांत मध्यवर्ती कारागृहं आहेत. तर, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कारागृह आहे.

मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे कैद्यांना जिल्हा कारागृहात ठेवण्याऐवजी मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाते. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे.

मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेच्या ३४० टक्के तर सोलापूर जिल्हा कारागृहात ३०६ टक्के आहे.

कैदी क्षमतेच्या २०१ ते ३०० टक्के कैदी असणारी सहा कारागृहे आहेत.

तर, १०१ ते २०० टक्के कैदी असलेली १७ कारागृहे आहेत.

गेल्या वर्षी राज्यातील कारागृहातून विविध प्रकारे सुटलेल्या ९९ हजार ३७३ न्यायाधीन कैद्यांपैकी ३४२५ (३.४५ टक्के) कैदी निर्दोष सुटले.

७१ हजार १०६ (७१.५५ टक्के) कैदी जामिनावर सुटले.

६ हजार ६२३ (६.६६ टक्के) कैद्यांना शिक्षा झाली आहे.

खुनाचा प्रयत्न या गुन्हेप्रकारात न्यायाधीन बंदीसंख्येत १९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

तर, बलात्कार या गुन्हेप्रकारात न्यायाधीन बंदीसंख्येत ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

सुटलेल्या ९९ हजार कैद्यांमध्ये खून किंवा खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपींची संख्या ६५ टक्के होती.सहा टक्के बलात्काराच्या आरोपातील, फूस लावून पळविण्याचा आरोप असलेली तीन टक्के होती. चोरी, घरफोडीतील आरोपींची संख्या दहा टक्के होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *