Mon. Aug 19th, 2019

दुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली – पृथ्वी शॉ

19 वर्षाखालील विश्वविजेत्या टीम इंडियाचा कर्णधार मुंबईकर पृथ्वी शॉने सर्दीवरचं औषध घेतल्याने त्यांना चांगलाच फटका बसला आहे.

0Shares

19 वर्षाखालील विश्वविजेत्या टीम इंडियाचा कर्णधार मुंबईकर पृथ्वी शॉने सर्दीवरचं औषध घेतल्याने त्यांना चांगलाच फटका बसला आहे. बीसीसीआयने उत्तेजकसेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने 8 महिन्यांची बंदी त्याच्यावर घातली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी औषधे घेताना वाडाच्या डोपिंग प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करावे, असे आवाहन क्रिकेटर पृथ्वी शॉ यांने ट्वीट करत केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

दुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो.

पण माझ्या चुकीतून अन्य युवा क्रिकेटपटूंनी धडा घ्यावा. त्यांनी औषधे घेताना आपले डॉक्टर अथवा फिजिओंच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी

वाडाच्या डोपिंग प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करावे, असे आवाहन करणारे ट्वीट टीम इंडियाचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ यांने केले आहे.

सर्दीच्या औषधातील प्रतिबंधित घटकांमुळे अडचणीत पृथ्वी शॉ अडचणीत आला आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक टी-20 क्रिकेट स्पर्धेदरम्यान पृथ्वीची उत्तेजक देवाण चाचणी घेण्यात आली होती.

त्या चाचणीच्या निकालात सर्दीच्या औषधांत असणारे टरबूटलीन हे प्रतिबंधक द्रव्य पृथ्वीने घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर 8 महिने बंदीची कारवाई बीसीसीआयने केली.


#PrithviShaw #BCCI #dopetest

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *