Thu. May 6th, 2021

कॉंग्रेस अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण ?

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने एनडीएला पसंती दिली आहे. देशभरात 542 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर 354 जागांवर एनडीए जिंकून आली आहे. त्यामुळे एनडीएने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. तसेच कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे आता अध्यक्षपदी कॉंंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदावरून राजीनामा देत असल्याचे प्रस्ताव मांडला.

राजीनाम्याचा प्रस्ताव कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाकारला असला तरी राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच राहुल गांधी राजीनामा मागे घेत नसल्यामुळे प्रियांका गांधींचे नाव सुचवण्यात आले होते.

मात्र गांधी कुटुंबाव्यतीरिक्त अध्यक्ष सुचवावे, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

त्यामुळे अध्यक्षपदासाठी सध्या कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

तसेच पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता असल्याचे जय महाराष्ट्रच्या सूत्रांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *