Sun. Oct 17th, 2021

‘या’मुळे देसी गर्ल सोशल मीडियावर ट्रोल; ‘तु ढोंगी’ असल्याचा आरोप

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर एका फोटोमुळे प्रचंड ट्रोल होत आहे. प्रियांका आपल्या नवऱ्यासोबत मयामीमध्ये 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळीसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये प्रियांका निकसोबत एका बोटीत बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांका सिगारेट ओढताना दिसत असल्यामुळे नेटिझन्सनी चांगलेच ट्रोल केले.

प्रियांका झाली ट्रोल –

प्रियांका चोप्रा आपला 37 वा वाढदिवस कुटुंबासोबत मयामीमध्ये साजरा करत आहे.

यावेळी त्यांचा बोटीवरील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये प्रियांका निक जोनास आणि तिची आई मधू चोप्रासोबत बसली आहे.

निक जोनासच्या हातात सिगार दिसत असून प्रियांका चोप्राच्या हातात सिगारेट दिसत आहे.

गेल्या वर्षी दिवाळीला प्रियांका चोप्राने सर्व भारतीयांना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.

तसेच मला अस्थमा असल्याची माहिती प्रियांकाने आवाहनाच्या माध्यमातून दिली.

अस्थमा असताना सिगारेट ओढत असल्यामुळे नेटिझन्सनी तिच्यावर प्रचंड टीका केली आहे.

तुला फक्त दिवाळीतच अस्थमा झाला होता का ? असा प्रश्न नेटिझन्सनी उपस्थित केला आहे.

तसेच काहींनी तु ढोंगी असल्याचा आरोप प्रियांकावर लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *