Wed. Oct 27th, 2021

मदाम तुसादमध्ये प्रियंका चोप्राचा मेणाचा पुतळा!

बॉलिवूडपासून हॉलीवूडमध्ये जाणारी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा केवळ बॉलिवूड अभिनेत्री राहिलेली नाही तर ग्लोबल स्टार बनलीय.

आपल्या वाढत्या लोकप्रियतेने देसी गर्लला मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

याचसोबत प्रियंका मादाम तुसादच्या 4 संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे.

आत्तापर्यंत केवळ अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या 3 संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.

प्रियंकाने न्यूयॉर्कस्थित मादात तुसाद संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून ती फार आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ प्रियंकाने पोस्ट केले आहेत.

गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. तिच्या या लग्नाची जगभर चर्चा झाली.

गेल्या काही वर्षांत प्रियंकाने हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मधून प्रियंका हॉलिवूडमध्ये दाखल झाली आणि मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

यानंतर बेवॉच, अ किड लाईक जेक अशा हॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *