Wed. Oct 27th, 2021

प्रियांका चोप्रा बनली ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची अ‍ॅम्बेसिडर

प्रियांका चोप्रावर आणखी एक नवी जबाबदारी…

कलाविश्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणाऱ्या प्रियांका चोप्रावर आणखी एक नवी जबाबदारी आली आहे. प्रियांका चोप्रा-जोनास आता ब्रिटिश फॅशन कॉन्सिलची दूत म्हणजे अ‍ॅम्बेसिडर बनली आहे.प्रियांकाने ट्विटरद्वारे याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे प्रियांका जगभरातून सदिच्छा येत आहे. प्रियांका चोप्रा फॅशन सेन्स आणि लोकप्रियता लक्षात घेत तिला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रियांकाने नव्या जबाबदारीची माहिती देताना पोस्ट केलं माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे. ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने माझी दूत म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता पुढचं वर्षंभर मला त्यावर काम करावं लागणार आहे. ब्रिटनमधल्या फॅशन इंडस्ट्रीला बूस्ट करण्यासाठी माझी निवड झाली आहे. आता मला त्यावर काम करावं लागेल. पुढचं वर्षभर मी लंडनमध्ये असेल. अनेक नव्या गोष्टी आता आम्ही लोकांसमोर घेऊन येणार आहेत. प्रियांका पुन्हा एकदा अभिनयासोबत फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय होणार असल्याचं माहिती झालं आहे.

प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाल्यानंतर प्रियांकाची चर्चा जगभरात झाली होती. निकसोबत लग्न केल्यानंतर प्रियांका आणखी चर्चेत आली होती. लग्नानंतर प्रियांका निकसोबत अमेरिकेत सेटल झाली आहे. सध्या प्रियंका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये ती काम करते आहे. याव्यतिरिक्त सोशल वर्क करतांना सुद्धा दिसते. त्यामुळेच या कामाची दखल घेऊनच ब्रिटिश फॅशन कॉन्सिलने तिला आपली दूत म्हणून नेमलं आहे.

प्रियांका भारतात काम करत असली तरी तिचा चाहता वर्ग जगभरात आहे. प्रियांकाचे आगामी काळात ‘मॅट्रिक्स 4’ यामध्ये झळकणार आहे. शिवाय नेटफ्लिक्सच्याही अनेक महत्वाच्या सिरीजमध्ये ती असणार आहे यापैकी ‘द व्हाईट टायगर’ हा त्यातला महत्वाचा प्रोजेक्ट असणार आहे. नव्या नव्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असणार आहे. प्रियंका हॉलिवूडशी संबंधित इतर अनेक लोकांसोबत ती काम करत आहे. यात गायिका सिलिन डियॉनचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *