Thu. May 6th, 2021

जगासमोर अभिनेत्री प्रियंका चोप्राने मांडलं वर्णभेदावर मत

जगात अनेक ठिकाणी वर्णभेद होत असतांना आपण बघत असतो. अमेरिकेत वर्णभेद हा बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. यावरून अनेक वेळा वाद झाला आहे. अलीकडचं अभिनेत्री प्रियंका चोप्राचं ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकात प्रियंकाने अमेरिकेतील वर्णभेदाच्या घटनांचा उल्लेख केला होता.

‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामिन बहराणी यांना अटलांटामध्ये त्यांच्या वर्णावरुन टीका करण्यात आली होती. त्याचा खुलासा त्यांनी केल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने यावर तिचे मत मांडले आहे. शिवाय रामिन यांनी एका मुलाखती या घटनेबद्दल सांगितले.

“आम्ही अटलांटामध्ये एका ठिकाणी अॅप्लच्या एका टीव्ही जाहिरातीचे चित्रीकरण करत होतो. त्या दिवशी कामात आम्हाला उशिर झाला, त्यामुळे मला तिथूनच रस्त्यावर झूम कॉलवर एवा डुवर्ने आणि बाफटा आणि अॅकेडमीच्या इतर सदस्यांच्या त्या मुलाखतीत सहभागी व्हावे लागले. मुलाखतीदरम्यान, माझ्या मागे एक गाडी उभी असल्याचे माझ्या लक्षात आले. जेव्हा ड्रायव्हरने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पाहिले (जे दक्षिण आशियाई आहेत) तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, “तुम्हाला सगळ्यांना वाटते की तुम्ही जग चालवता? तुम्ही सगळे जग चालवत नाही तर खराब करत आहात,” त्यावेळी त्या व्यक्तीच्या मित्राने त्याला शांत होण्यास सांगितले आणि त्याने गाडी चालू केली. तेव्हा तो बाहेर आला आणि म्हणाला, “तू तुझ्या देशात परत जा!” असे रामिन यांनी सांगितले.

यात आत प्रियांकाने तिचे मत मांडत रामिनची बाजू घेतली आणि म्हणाली, “रामिन सोबत जे झाले त्यानंतर प्रश्न येतो की या देशात कोणाला हक्क आहे आणि कोणाला नाही? हा देश परप्रांतियाच्या बळावर त्यांच्या स्वप्नांवर बांधला गेला आहे. त्यांना अमेरिकेत मिळणारी वागणूक ही अगदी चुकीची आहे. अमेरिकाला य गोष्टींसाठी ओळखले जातं नाही. अमेरिकेला आम्ही सुरक्षित ठिकाण, स्वतंत्र जीवण म्हणून ओळखतो.” असं प्रियंकाने म्हटलं.

प्रियंकाने बरेचं वेळा तिचे कॉलेजचे अनुभव हे मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. वर्णभेद तिच्या सोबत देखील अमेरिकेत झाला होता. त्यामुळे तिला परत भारतात याव लागलं होतं. प्रियंका अनेकदा तिचे मत हे समाजापुढे मांडत असते.आज तिने तिच्या कर्तुत्वावर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. प्रियांका सध्या पती निक जोनससोबत लंडनमध्ये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *