Sun. Sep 15th, 2019

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियंका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी

0Shares

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी खेळी खेळली असून प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते.

आता प्रियंका गांधी यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या, मात्र त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते.

प्रियंका गांधी यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे.

प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

 

प्रियंका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिममधील महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच के सी वेणुगोपाल यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आता आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी अमित शाह- नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यात कितपत यशस्वी ठरेल, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *