Wed. Jun 23rd, 2021

लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव आवश्यक – प्रियंका  गांधी  

आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी प्रियांका गाधी यांनी मोदी आणि भाजपा सरकावर जोरदार टीका केली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचा आहे. असं मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं आहे.  या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना काँग्रेसने पूर्व उत्तर प्रदेशातील प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. यंदा त्यांनी अमेठी आणि रायबरेलीच्या बाहेर निवडणूक प्रचार केला आहे.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी ?

पंतप्रधान पदावर  विराजमान  झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना खूप त्रास दिला आहे .
मोदी सरकारच्या काळात लोकांनी खूप सहन केलं आहे.
त्यामुळे देशाची लोकशाही वाचवणं गरजेचं असून त्यासाठीच ही लढाई लढली जात आहे.
तसेच भाजपा सत्ततून नक्की बाहेर जाणार असा विश्वास व्यक्त केता  आहे.
प्रियांका गांधी आणि पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे.
यावेळी माध्यमांशी  बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोदींनी 15  लाख रुपये देण्याचं आणि रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं.

अशा कोणत्याचं आश्वासनावर मोदी सध्या सभांमध्ये बोलत आहे.

ते  या मुद्दयावर बोलायचं सोडून ते भलत्याच विषयावर बोलत असतात. अशी टीका त्यांनी केली आहे,

असं सांगतानाच यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *