Mon. Nov 29th, 2021

प्रियांका गांधींचे ‘मिशन यूपी’, कार्यकर्त्यांचा ‘रोड शो’ला भरघोस प्रतिसाद

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून चार दिवसीय लखनौ येथे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रियांका गांधी दररोज 13 तास काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच लखनौला पोहोचल्यावरलोकसभा निवडणुकांनासाठी प्रियांका गांधी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर रणनीती बनवणार असल्याचे समोर आले आहे.प्रियांका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विमानतळापासून प्रदेश मुख्यालयपर्यंत रोड शो केला. या रोड शोला कार्यकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. तसेच या रोड शोवेळी राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ असाही नारा लावला होता.

कसा असेल प्रियांका गांधींचा यूपी दौरा ?

12 फेब्रुवारी

प्रियांका गांधी मोहनलालगंज आणि दुपारी उन्नावच्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.

त्यानंतर प्रियांका वाराणसी, गोरखपूर, कौशांबी, फूलपूर, अलाहाबाद, चंदौली, गाजीपूर, धौरहरा, फतेहपूर आणि लखनौच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार.

13 फेब्रुवारी

बाराबंकी, कैसरगंज, बासगाव, देवरिया, डुमरियागंज, कुशीनगर, संत कबीरनगर, महाराजगंज, फैजाबाद, श्रावस्ती, गोण्डा आणि बस्ती येथील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतील.

14 फेब्रुवारी

प्रियांका गांधी सीतापुर, सलेमपुर, घोसी, आजमढ  जौनपुर, रॉबट्र्सगंज,मिरझापूर,भदोही, अंबेडकर नगर, बलिया और मिश्रिख येथील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *