Mon. Sep 27th, 2021

वाराणसीत पीएम मोदी VS प्रियंका गांधी सामना नाही

उत्तर प्रदेशमधून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला कॉंग्रेसने पूर्णविराम दिला आहे. कॉंग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर न करता अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2014 साली सुद्धा कॉंग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली होती.

मोदी VS प्रियंका गांधी ?

उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रियंका गांधी यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू होती.

कॉंग्रेसने जाहीर केलेल्या यादीत प्रियंका गांधी यांचे नाव नसून अजय राय यांचे नाव जाहीर केले

मात्र कॉंग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कॉंग्रेसने अजय राय यांना 2014 साली उमेदवारी दिली होती.

मात्र 2014 साली अजय राय यांचा पराभव झाला होता.

काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या.

त्यावेळी त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी अशी विनंती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अजय राय अशी लढत बघायला मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *