Jaimaharashtra news

प्रियंका गांधींमुळे UP मध्ये काँग्रेसला जनाधार मिळणार नाही- श्याम जाजू

प्रियंका गांधी वाड्रा यांच्या येण्याने उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसला जनाधार मिळणार नाही. मोदींना रोखण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी एकत्र झालेल्या पक्षांना जनता नाकारेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या वसंत स्मृती कार्यालयात जाजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपचं नवं अभियान!

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती हा निर्णय पार्लमेंटरी समिती घेणार आहे.
लवकरच युतीबाबत चित्र स्पष्ट होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
भाजपा लवकरच ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’, हे अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच 12 फेब्रुवारीपासून ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या अभियानाची देशात सुरुवात होणार आहे.
अमित शहा गुजरातमध्ये हे अभियान सुरु करणार आहेत.
‘पत्र संवाद पेटी’तील सर्व पत्रांची दखल घेतली जाणार आहे.
याकरीता विशेष समिती बनविण्यात येणार आहे.

मात्र जाजू यांच्यामते जरी प्रियंका गांधींना जनाधार मिळण्याची शक्यता नसली, तरी लखनौ येथे प्रियंका गांधींच्या रोड शो ला तुफान प्रतिसाद मिळताना दिसला. प्रियंका गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मिळून केलेल्या शक्तीप्रदर्शनाला लखनौच्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी 14 किमीचा रोड शो करण्यात येतोय.

Exit mobile version