चैत्यभूमीवर समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीसुद्धा चैत्यभूमीवर हजेरी लावली. मात्र दरम्यान चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
समीर वानखेडे हे सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजर झाले. मात्र तेथे समीर वानखेडे विरोधात भीमशक्ती रिपब्लिकन सेना आक्रमक झाली. चैत्यभूमीवर समीर वानखेडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. समीर वानखेडे यांना अभिवादनाचा नैतिक अधिकार नसल्याचा संघटनेने दावा केला असून ‘समीर वानखेडे मुर्दाबाद’ अशा घोषणा वानखेडे विरोधात देण्यात आल्या.
भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने समीर वानखेडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे समीर वानखेडेंचे समर्थक आणि विरोधक यांच्या बाचाबाची झाली. त्यामुळे चैत्यभूमीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वानखेडे यांना अभिवादनाचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा भीमशक्ती रिपब्लिक संघटनेने केला आहे.