उदयनराजेंनी ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – संजय राऊत

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी उदयन राजेंवर हल्लाबोल केला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पुण्यामध्ये आज लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
राऊतांना कसले पुरावे द्यायचे ? आम्ही घराण्यात जन्मलो, हे सर्वांनी पाहिलंय, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिली आहे.
दाऊदला मी अनेकवेळा पाहिलंय, बोललोय आणि दमही भरला – संजय राऊत
दरम्यान उदयन राजेंनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली होती.
या पत्रकार परिषदेत उदयन राजेंनी संजय राऊतांवर नाव न घेता सडकून टीका केली होती.