ईडीकडून नवाब मलिकांची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मलिकांच्या आठ संपत्तींवर ईडीने टाच टाकली आहे. यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, उस्मानाबादमधील १४८ एकर जमिनीचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्या कोणकोणत्या मालमत्तेवर टाच?
कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा
कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स
कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड
वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स
ठाण्यातील संपत्ती
उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन
नवाब मलिकांना दणका
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना अटक केली. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आता ईडीकडून मलिकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.