Tue. May 17th, 2022

राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध 

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून केतकी चितळेवर टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात केतकीच्या पोस्टचा विरोध केला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी केतकीने केलेली विधाने चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

पत्रात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


केतकी चितळेच्या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही.


विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो.


घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे.


कोणीही राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नये.


अशाच टाळक्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते.


हे वेळीच आवरणे गरेजेचे आहे.


केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल

केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. शरद पवारांविरोधात आक्षापार्ह पोस्ट केल्यामुले राष्ट्रवादी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. केतकी चितळे हिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी विरोधात कलम ५००, ५०५ (२), ५०१ आणि १५३ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुण्यातही केतकीविरोधात राष्ट्रवादीतर्फे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे केतकी चितळेला अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.