Fri. May 7th, 2021

लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्य़ा विकृताला अटक

रेल्वे प्रवासादरम्यान संधीचा फायदा घेऊन एकट्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला CSMT लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला नराधम हा विकृत असून या आधीसुद्धा त्याच्यावर अश्याप्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहेत.

काय घडलं नेमकं?

तक्रारदार महिला ही परेलच्या एका शाळेत शिक्षिकेचे काम करते.

आठवड्याभरपूर्वी सँडहर्स्ट रोड ते मस्जिद बंदर रोडच्या दरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडला होता.

पोलिसांनी CCTV च्या मदतीने या विकृतला बेड्या ठोकल्या आहेत.

अशरफ अली करीमुल्ला शेख असं या नराधमाचं नाव आहे.

हा नराधम पोलीस रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे.

याआधी 2017 साली त्याने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी त्या मुलीने लोकलमधून उडी मारली होती.

या गुन्ह्यात त्याला एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

ऑक्टोबर 2018 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा हा गुन्हा केलाय.

CCTVच्या माध्यमातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *