Sun. Jun 20th, 2021

विकृत प्राध्यापकाचे विवाहित प्राध्यापिकेला अश्लील मॅसेजेस, संतापाच्या भरात जीवघेणा हल्ला!

कॉलेजमध्ये शिक्षणासोबतच अनेक मुला मुलींच्या प्रेमकहाण्या जन्म घेत असतात. त्यातल्या काही यशस्वी होतात, तर काही होत नाही. तर काही प्रेमकहाण्या या एकतर्फीच असतात. काहीवेळा अशी एकतर्फी प्रेमप्रकरणं गुन्हेगारीच्या वाटेवर गेल्याच्या दुर्दैवी बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र जळगावामधील एका कॉलेजात विकृत प्राध्यापकाचं प्राध्यापिकेवर असणारं एकतर्फी प्रेम प्राध्यापिकेच्या जीवावर उठल्याची घटना घडली आहे.

एकतर्फी प्रेमातून एका सनकी प्राध्यापकाने एका विवाहित प्राध्यापिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावात घडला आहे. हा प्रकार कॉलेजच्या वर्गातच घडला. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत पीडित प्राध्यापिका आणि आरोपी प्राध्यापक के. ई. पाटील या दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं.

नेमकं काय घडलं ?

एकतर्फी प्रेमातून professor ने विवाहित प्राध्यापिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.

आरोपी प्राध्यापक आणि पीडित प्राध्यापिका दोघेही नाडगाव येथील आयटीआयच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत .

आरोपी के. ई. पाटील यांचं पीडित प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेम होतं.

मात्र ही प्राध्यापिका आधीच विवाहित होती. त्यामुळे ती आरोपीला प्रतिसाद देत नव्हती.

गेल्या काही महिन्यांपासून के. ई. पाटील पीडित प्राध्यापिकेला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर अश्‍लील मॅसेज करत होता.

यासंदर्भात प्राध्यापिकेने आपल्या पतीकडेही तक्रार केली होती.

आपल्या मॅसेजला प्रतिसादच मिळत नसल्याने के. ई. पाटील अस्वस्थ झाला होता.

पीडित professor ने विरोधात यासंदर्भात collegeच्या वरिष्ठांकडेही तक्रार केली.

मात्र वरिष्ठ, संचालक मंडळ आणि प्राचार्य यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

प्राध्यापिकेने आपली तक्रार वरिष्ठांकडे  केल्याचं के. ई.पाटील समजल्यावर तो संतापला.

बुधवारी सकाळी कॉलेजमध्ये पीडित प्राध्यापिका वर्गात एकटी असल्याचं त्याला दिसलं.

या संधीचा गैरफायदा घेत संतापलेवला के. ई.पाटील वर्गात शिरला आणि यांनी वर्गाचा दरवाजा बंद केला.

त्यानंतर के. ई. पाटील याने सुऱ्याने प्राध्यापिकेच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पोटावर वार करून जखमी केलं.

त्यानंतर या सनकी प्राध्यापकाने स्वत:वरही वार केले.

हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत दोघांना यांना बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर पीडित प्राध्यापिकेला त्वरीत जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *