Mon. Jul 22nd, 2019

आता ‘PUBG’मध्ये ‘बाहुबली’!

0Shares

सध्या तरुणांमध्ये जबरदस्त वेड असणाऱ्या PUBG या गेममध्ये खेडाळूंना बाहुबली बनायची संधी मिळणार आहे. ‘बाहुबली’ सिनेमाची भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता विचारात घेऊन PUBG बनवणाऱ्या Tencent कंपनीने बाहुबलीलाही आपल्या गेममध्ये आणलं आहे.

मध्ययुगातला बाहुबली खेळणार PUBG?

PUBG या गेमची लोकप्रियता सध्या प्रचंड वाढली आहे.

भारतातही गेम खेळणारी मुलं आणि तरुण यांचं प्रमाण खूप आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतात South Indian सिनेमांचंही वेड चांगलंच वाढलंय.

त्यातून ‘बाहुबली’ सिनेमाचं गारूड तर प्रेक्षकांवर अजूनही आहे.

बाहुबलीची लोकप्रियता लक्षात घेऊन आपला PUBG गेम आणखी लोकप्रिय करण्याचा विचार हा गेम बनवणाऱ्या कंपनीने केला.

त्याप्रमाणे PUBG मध्ये आता नवा अपडेट आला आहे.

‘The Great Indian Warrior Outfit’ या नावाचा ड्रेस त्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

हा ड्रेस म्हणजे बाहुबलीचा लोकप्रिय मुकुट आणि चिलखत.

त्यामुळे आता लोक बाहुबलीच्या स्टाईलने PUBG खेळू शकतील.

या गेममुळे बाहुबलीची लोकप्रियताही आणखी वाढणार आहे.

PUBG बद्दल तक्रारींचं वाढतं प्रमाण

PUBG गेममुळे तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये violence वाढत आहे. गेमसाठी मुलं वाट्टेल त्या थराला जात आहेत. त्यामुळे या game वर बंदी घालावी, अशी मागणीही एकीकडे होत आहे. त्यातच आता बाहुबलीच्याच रूपात PUBG खेळायची संधी मिळणार असल्यामुळे भारतीयांमध्ये या गेमची craze आणखी वाढण्याची शक्यता आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: