Wed. Feb 19th, 2020

PUBGचा ‘हा’ अपडेट डाउनलोड केला का ?

PUBG खेळणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सध्या जगभरात प्रसिद्ध खेळ पबजीने एक नवीन अपडेट रिलीझ केला आहे. या  अपडेटमध्ये झोम्बी मोड असणार आहे. PUBG  मोबाईलचा हा नवा अपडेट Android आणि iOS हे दोन्ही  व्हर्जनमध्ये रिलीझ करण्यात आला आहे. या नव्या अपडेटसाठी या गेमचं सर्व्हर काही तासांकरीता बंद ठेवण्यात आले होते. हा नवा अपडेट काही दिवसांपूर्वीच रिलीझ करण्यात आला आहे. या अपडेटमुळे गेममधील मज्जा अधिक झाली असून आता झोम्बीशीही सामना करावा लागणार आहे.

नेमकं काय आहे नवा अपडेट ?

पबजी मोबाइलचा हा 0.11.0 व्हर्जन आहे.

या अपडेटमध्ये PUBG मोबाईल Zombie: Survive Till Dawn असा मोड रिलीझ केला आहे.

झोम्बी मोडच्या व्यतिरिक्त PUBG मोबाईल 0.11.0 अपडेट Vikendi मॅपमध्ये मूनलाईट वेदर मोड, पॅन्डेमिक ट्रेजक इव्हेंट तसेच रेसिडेंट इव्हिल २ थीम आणि म्यूझिकचा समावेश करण्यात आली आहे.

त्याचबरोबर SMG आणि असॉल्ट रायफल वॉर मोड्स आता डबल द एमो यांच्यासह सुरू झाले आहे.

या अपडेटमुळे खेळाडूंसाठी चिकन डिनर मिळणं प्रचंड कठीण होणार असल्याचे समजते आहे.

कारण यामध्ये झोम्बीजना आणि त्यांच्या बॉसचा खात्मा करावा लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *