मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत शनिवारी दिनांक १४ मे रोजी बीकेसी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची शिवसेनेकडून जय्यत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या सभेत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेनेचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायंच काम मी करून दाखवतो’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजातले वाक्य ऐकू येत आहे. तसेच १४ मे रोजी मी अनेकांचे मास्क उतरवणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगा हटवण्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
राज ठाकरे यांनी ठाणे, औरंगाबाद येथे जाहिर सभा घेतल्या होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनामुळे टाळेबंदी लागली. त्यामुळे दसरा मेळावादेखील शिवाजी पार्कवर न होता षण्मुखानंद सभागृहात झाला होता. त्यामुळे शिवसेनेकडून कोणत्याही जाहिर सभा घेण्यात आल्या नाही. त्यानंतर आता राज्यातील प्रलंबित निवडणूका लवकरात लवकर जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मविआचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच खुल्या मैदानात शिवसेनेकडून जाहिर सभा घेण्यात येत आहे. आता, या सर्व गोष्टींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीकेसी मैदानातील जाहीर सभेचं आवाहनही शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये ‘खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे’, असं सांगण्यात आलं आहे.
यायलाच पाहिजे!🚩 pic.twitter.com/ijWJ7ZWPMi
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 8, 2022