Fri. Jan 21st, 2022

पुलवामा हल्ल्यात साताऱ्यातील जवान शहीद

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवार सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सातारा जिल्हयातल्या जावळी तालुक्यातील मोहाटगावाचे सुपुत्र रविंद्र बबन धनावडे यांना

अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले आहे.

 

पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात रविंद्र धनावडे शहीद झाले आहेत. ते 38 वर्षांचे होते. रविंद्र यांची 14 महिन्यांची

सेवा बाकी राहिली होती.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. रविवारी रविंद्र धनावडे यांचे पार्थीव पुण्यामध्ये येणार

आहे. या दुर्घटनेमुळे मोहाट गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *