Sun. Sep 22nd, 2019

पुलवामा हल्ला मोदी आणि इम्रान खान यांची फिक्सिंग -कॉंग्रेस नेते

259Shares

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या संघटनाने केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसाने पाकिस्तानमध्ये घुसून जैशच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाल्याचे असल्याची माहिती वृत्तांनी प्रसिद्ध केली आहे. मात्र पुलवामा हल्ला हा पंतप्रधान मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मिळून केल्याचा आरोप कॉंग्रेस नेते बी.के हरिप्रसाद यांनी केला आहे.

बी.के हरिप्रसाद यांचं वादग्रस्त विधान –

14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ला झाला.

या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले.

कॉंग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी या हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पुलवामा हल्ला हा ‘नरेंद्र मोदी आणि इमरान खान या दोघांची फिक्सिंग होती,असा दावा कॉंग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे.

सरकारला जवानांच्या शौर्याचे श्रेय घेता येते.

सीमेवरील RDX पकडता येत नाही का ? ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

259Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *