Wed. May 22nd, 2019

टीम इंडियाची पुलवामा शहीद जवानांना ‘अनोखी’ श्रध्दांजली

30Shares

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तिसरा  एकदिवसीय सामना रांची येथे सुरू आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाने पुलावामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली आहे.

टीम इंडियाची अनोखी श्रद्धांजली –

ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे.

नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

यावेळी टीम इंडियाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

टीम इंडियाने लष्करासारखी कॅप परिधान केली आहे.

या संघातील खेळाडू या सामन्यातील मानधन राष्ट्रीय संरक्षण निधीला देणार असल्याची माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली.

यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात भारतने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *