Sat. Oct 1st, 2022

दहशतवाद्याचा मार्ग पत्करलेल्या मुलांना समर्पण करण्यास सांगा; सैन्याचे आवाहन

जम्मू- काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्य आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यातील मातांना आवाहन केलं आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरु शकतो.

आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करतोय की तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करायला सांगा.

असं सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी म्हटलं आहे.

जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे ढिल्लन यांनी ठणकावले आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा आदिल दार या दहशतवाद्याने केला होता.

आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असून तो मार्च 2018 मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या 100 तासांच्या आत आम्ही जैश- ए- मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.