Jaimaharashtra news

पुलवामा हल्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरचा खात्मा

पुलवामा हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूचं आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी चकमक सुरु झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.तर आज सकाळी पुन्हा एकदा त्रालमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. यामध्ये  पुलवामा हल्याचा मास्टरमाईंड सज्जाद मुदस्सीरला ठार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका कोण आहे हा सज्जाद मुदस्सीर?

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात  भ्याड हल्ला करण्यात आला होता.

या हल्याची जबाबदारी जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. तर यामध्ये सज्जाद मुदस्सीर   मास्टरमाईंड असल्याची माहीती समोर आली होती.

सोमवारी झालेल्या चकमकीत सज्जाद मुदस्सीर याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती समोर आली आहे.

त्रालमध्ये ही चकमकीत झाली असून सज्जाद मुदस्सीर ठार झाला आहे.

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यात सज्जाद मुदस्सीरच्या गाडीचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आहे.

पुलवामामधील पिंगलिश मध्ये  चकमक

रविवारी संध्याकाळी पुलवामामधील पिंगलिश गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली.

पिंगलिश गावात दहशतवादी लपलेल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

लष्कराची ४२ राष्ट्रीय रायफल्सची तुकडी, जम्मू – काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली होती

या चकमकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version