लष्कराच्या गस्तीपथकावर भ्याड हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था, पुलवामा
पुलवामा जिल्ह्यातील त्रालजवळच्या साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देताना 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. तसेच लष्काराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला.
दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सध्या सुरु आहे. या मोहिमेत लष्कराच्या जवानांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यावर लोकांकडून दगडफेक करण्यात येत असल्याच्या घटना वाढल्याची माहिती मिळत आहे.