Mon. Dec 6th, 2021

#PulwamaTerrorAttack : ‘बीग बीं’ची शहिदांच्या कुटुंबीयांना ‘एवढी’ मदत

Indian Bollywood actor Amitabh Bachchan attends a promotional event for the updated "Raghupati Raghava Raja Ram" and the upcoming political thriller Hindi film "Styagraha" in Mumbai on July 25, 2013. AFP PHOTO/STR

जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 हून अधिक जवानांना वीरमरण प्राप्त झालं. या शहिदांच्या कुटुंबीयांना बॅलिवूडचे महाअभिनेते अमिताभ बच्चन यांनी आर्थिक पाठबळ देण्याचं योजलं आहे.

बच्चन यांच्याकडून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत

अमिताभ बच्चन यांनी  कृतज्ञतेपोटी शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात त्यांनी एका ट्वीटला रिप्लाय केला आहे.

पुलवामामधील हल्ल्यात 49 जवान शहीद झाले आहेत. या सर्व शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची आपली योजना असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

म्हणजेच बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन या शहिदांच्या कुटुंबीयांना एकूण 2.5 कोटी रुपयांची मदत करणार आहेत.

ही मदत शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत नेमकी कशाप्रकारे करायची, याबाबत सध्या योजना सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमादरम्यानही अनेक सामाजिक संस्था आणि समाजसेवक यांच्याशी बच्चन यांचा संपर्क आला.

त्यावेळी या समाजसेवकांपासून आपण प्रेरित होत असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले होते.

त्यावेळीही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींची मदत बच्चन यांनी केली होती.

त्यानंतर आता शहिद जवानांना मदत करण्यासाठीही बच्चन यांनी पुढाकार घेतलाय.

 

दहशतवादी हल्ल्याची बातमी मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती रद्द केली होती.

हा कार्यक्रम आता शनिवारी होणार आहे.

काय घडलं होतं?

जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेच्या आदिल अहमद दार या अतिरेक्याने हा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील जनतेचे रक्त खवळले असून या कृत्याचा बदला घेण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *