Jaimaharashtra news

पुण्यात पोलिसांमुळे 30 वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

पुण्यातील कर्वेनगर परिसरात 30 वर्षीय तरुण आत्महत्या करत असताना पोलिसांनी वाचवल्यामुळे तरुणाचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तरुणाची आई पोलीस स्थानकात धावत आली. आपला मुलगा आत्महत्या करत असल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाचे घर गाठले आणि त्याला वाचविण्यात यश मिळाले.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील कर्वेनगर परिसरात एक 30 वर्षीय तरुण आत्महत्या करत होता.

तरुणाच्या आईला आपला मुलगा आत्महत्या करत असल्याची माहिती मिळताच पोलीस स्थानकात धाव घेतली.

पोलीस स्थनकात पोहोचताच आपला मुलगा आत्महत्या करत असल्याचे तरुणाच्या आईने सांगितले.

माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाच्या राहत्या घरी धाव घेतली.

घराचा दरवाजा तोडून या तरुण ओढणीने गळफास घेत असल्याचे समजले.

त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी धाव घेत ओढणी कापून खाली उतरवले.

त्याचबरोबर नजिकच्या रुग्णालयात दाखल केले.

पुण्यातील वारजे पोलिसांमुळे 30 वर्षीय तरुणाचे जीव वाचले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली आहे.

Exit mobile version