Mon. Dec 6th, 2021

पुण्यात आजीबाईंनी सोडवली वाहतुक कोंडी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नेहमी वाहतूक समस्याला सामोरे जावं लागत असून वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन उपाय योजना शोधत असते. पुण्यात वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली आहे. जिथे वाहतुक पोलीस वाहतुक कोंडी सोडविण्यात अपयशी ठरतात तिथे चक्क आजीबाई रस्त्यावर उतरून वाहतुक कोंडी सोडवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आजीबाईंचा उत्साह पाहून तरुणांनाही लाजवणारा आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यामध्ये एक आजीबाई वाहतुक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चौकातील वाहतुक कोंडी सोडवतानाचा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आजीबाईंनी 2 मिनिटात वाहतुककोंडी सोडवल्याचे दिसत आहे.

वाहतुक पोलीस असताना या आजीबाईंनी वाहनांना थांबवत, धावपळ करत गाड्यांना वाट देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आजीबाईंचा उत्साह पाहून तरुणांनाही लाजवणारा आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *