पुण्यात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची पारदर्शक हाणामारी
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे महापालिकेच्या भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. स्वीकृत सदस्य निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप कार्यालयात वाद उफाळून आला.
माजी गटनेते गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्यात जोरदार हाणामारी झाली..महापालिका निवडणुकीत पराभव झालेले माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी जोरदार लॉबिंग केले होते.
गणेश घोष यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यामुळे दोन्ही बाजुचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. यातून बीडकर आणि घोष यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.