Fri. Jan 21st, 2022

गडकरी आणि पवार एकाच व्यासपीठावर! ‘मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र’

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगर विकास खात्यावर सडकून टीका केली आहे. शहराचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावणारे नगर

विकास खाते हे ‘होपलेस’ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपले टिकास्ञ सोडले.  त्यांनी सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

 

पुणे शहराच्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना रोखण्यासाठी नियोजित दुमजली उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते

वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

विकासकामांसाठी निधी मोठया प्रमाणात उपलब्ध असून अधिकारी मात्र, वेळेवर काम करीत नसल्याने काम रखडत असल्याची नाराजीही गडकरी यांनी

व्यक्त केली. यासाठी काठी हातात घेतल्याशिवाय कामे होणार नाहीत असे त्यांनी सांगितले. 

 

मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करत असल्याचं सांगत त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.

  

यावेळी शरद पवार म्हणाले, रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी

आवश्यक आहे. रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गडकरी

आणि पवार एकाच व्यासपीठावर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *