Sat. Apr 20th, 2019

पुणे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विकासाची चतु:सूत्री

37Shares
पुण्यात सध्या निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी रंगात आली आहे.काँग्रेसकडून मोहन जोशी तर भाजपकडून गिरीश बापट जोरदार प्रचार करत आहेत.पुण्यात काँग्रेसने आपला जाहीरनाम्याचे प्रकाशन केले आहे. समतभूमी अर्थात महात्मा फुले वाडा येथे  महिला,पहिला मतदार,चौकीदार यांच्या हस्ते  हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.या जाहीरनाम्यात काँग्रेसकडून अनेक आश्वासने पुणेकरांना देण्यात आली आहेत. यामध्ये पुण्याच्या विकासाची चतु:सूत्री तयार करण्यात आली आहे.

जाहीरनाम्यात पुण्याच्या विकासाची चतु:सूत्री

सुरक्षित पुणे

गतिमान पुणे

हरित पुणे

आनंदी पुणे

अशी पुण्याच्या विकासाची चतु:सूत्री तयार करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे

प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार देणार
महिला सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणार
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधरण्यासाठी प्रयत्न करणार
शहरात शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी अभ्यासिका वाढवणार
 पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणणार
पुण्यात नदीकाठ रस्ता करणार
पुणे शहर शंभर टक्के  डिजिटल करणार
प्रत्येक झोपडपट्टीवासीयला घर देणार
पुणेकरांना मुबलक पाणी देणार
आरोग्यासाठी रुग्णायल तयार करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *