Sat. Jul 11th, 2020

पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडली आहे.

याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हर्षदा सत्यजित लंकेश्वर (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचे पती सत्यजित विजय लंकेश्वर (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याप्रकरणी विवाहितेचे वडील राजाराम महादेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात माहेराहून काही आणले नाही या कारणावरून सत्यजित हा हर्षदा यांचा वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत छळ करीत होता.

या छळास कंटाळून हर्षदा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, हर्षदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सत्यजित लंकेश्वर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *