Fri. Jan 21st, 2022

पुण्यात एकाच दिवशी दोन विश्वविक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती विषयी दरवर्षी एक विशेष बाब समोर येत असते. यावर्षी गणपतीला 125 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून

शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला आहे.

 

 

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वतीनं अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. मोदकाच्या आकारातील तब्बल १ हजार ९७०

किलो वजनाचा केक तयार करून हा विश्वविक्रम करण्यात आला आहे. दिवसभर भक्तांना हा केक प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.

 

 

तर दुसरीकडे पुण्याच्या सणस मैदानावर विद्यार्थ्यांकडून 3000  गणेशमूर्ती साकारण्याचा विश्वविक्रम पार पाडण्यात आला. पुण्यात एकाच

दिवशी झालेल्या या दोन विश्वविक्रमांची गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशभक्तांमध्ये

आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *