सैराटचा थरार! पुण्यात सासऱ्याचा जावयावर गोळीबार

आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना अहमदनगर नुकतीच घडली आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झालाय मुलगा मृत्यूशी झुंज देत होता. ही घटना ताजी असतानाचं आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीच्या नवऱ्यावर मुलीच्या चुलत्याने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.पुण्यामध्ये चांदणी चौकात बुधवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली आहे. या प्रकारानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
तुषार पिसाळ आणि विद्या तावरे या दोघांनी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे.
विद्या ही राजू तावरे याची पुतणी आणि आकाश तावरे याची बहीण आहे.
या दोघांच्या विवाहानंतर तावरे कुटुंबियांकडून या लग्नाला विरोध करण्यात आला होता. 8
8 मे च्या संध्याकाळी तुषार त्याच्या मित्रांसह एका लग्नाला गेला होता. तेथून परत येताना तुषारची दुचाकी बंद पडली .
रात्री 8 च्या सुमारास चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर असता काही लोकांनी त्यांना घेराव घातला.
विद्याचे चुलते राजू तावरे, भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी त्याला घेराव घातला होता.
राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून आणि पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या.
तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
यानंतर तुषारला शिवीगाळ करत जखमी अवस्थेत टाकून त्यांनी तेथून पळ काढला.
अहमदनगरमध्ये ‘ऑनर किलिंग’,आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने दोघांनाही रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता
हे ही वाचा – https://www.jaimaharashtranews.com/ahmednagar-honour-killing-case/