Sat. Apr 4th, 2020

पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून पतीने केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून हत्येच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र पत्नीच्या आजारपण संपावं यासाठी चक्क हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी रावेत येथे घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

वृषाली गणेश लाटे आणि गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून वृषाली या आजारी होत्या.

आजारपणात त्यांना होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या.

त्यामुळे त्यांची होणारी अवस्था पाहून पतीने टोकाचं पाऊल उचललं.

पत्नीचला होणारा त्रास कायमचा संपावा म्हणून त्यांनी थेट तिच्या डोक्यात हातोडा घालून तिच्या वेदना कायमच्या संपवल्या.

पत्नीची निर्घृण हत्या करून त्यानंतर पतीने स्वतःही आत्महत्या केली.

पत्नीच्या यातना सहन न झाल्याने तिची हत्या करून आपण आत्महत्या करत असल्याचं गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीची हातोडी डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *