Sun. Jun 16th, 2019

‘या’ अजब कारणामुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज

0Shares

पतीचे बाहेर अफेअर असल्यामुळे,हुंड्यासाठी छळ होत असल्यामुळे,किरकोळ कारणावरून वाद झाल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे पतीने पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वजन वाढल्यामुळे पतीने उपाशी ठेवल्याचे सांगत पत्नीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य उंड्री परिसरातील एका सोसायटीत  राहत होते.
  • 2006 मध्ये त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते, त्यांना 2 मुलेही आहेत.
  • 10 वर्षे गुण्यागोविंदाने त्यांचा संसार सुरू होता. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. त्यांच्यात सतत वाद होत होते.
  • त्यांच्यात वाद झाले की पती नेहमी तुझे वजन वाढले आहे असे सांगून पतीला उपाशी ठेवत होता.
  • 2016 मध्ये संबंधित पतीचे दुसऱ्याच एका महिलेशी अफेअर जुळले, यातून पती महिलेला सोडून बावधन परिसरात राहण्यास गेला.
  • त्यांनंतर त्याने घटस्फोटासाठीही अर्ज दाखल केला. त्यानंतर त्याने सध्या महिला राहत असलेला फ्लॅट विकायचा असल्यामुळे तिला हा फ्लॅट खाली करण्यास सांगितले.

अखेर या महिलेने पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *