Jaimaharashtra news

जातपंचायतविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

जातपंचायतविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला. पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तेलगू मढेलवार परीट जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल झाला. अंनिसच्या पुढाकारानं जातपंचायतीवर ही कारवाई करण्यात आली.

 

आंतरजातीय विवाह केल्यानं तेलगू मढेलवार जातपंचायतीनं बहिष्कृत केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Exit mobile version